महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२४ वर्षासाठीचे अंदाजित वेळापत्रक (Tentative Timetable) जाहीर केले आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यासाठी या वेळापत्रकाचा खूपच फायदा होणार आहे. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत मेकॅनिकल इंजिनियर्सना २०२४ मध्ये MPSC मार्फत किती आणि कोणकोणत्या जागा आहोत.
ज्या उमेदवारांचे शिक्षण Diploma (पदविका), Degree (पदवी) हि Mechanical Engineering (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) मधून झाली आहे किंवा होणार आहे त्यांच्यासाठीचा हा लेख आहे.
खालील तक्त्यामध्ये सन २०२४ मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी संबंधित होणाऱ्या सर्व परीक्षांचे विस्तृत स्वरूपात अंदाजित वेळापत्रक दिले आहे.
महाराष्ट लोकसेवा आयोगMPSC |
|||||||
स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक सन – २०२४ |
|||||||
अ. नं. | परीक्षा | संवर्ग | जाहिरात | पूर्व परीक्षा | मुख्य परीक्षा | ||
परीक्षेचा दिनांक | निकालाचा दिनांक | परीक्षेचा दिनांक | निकालाचा दिनांक | ||||
१ | महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा -२०२४ | सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक | फेब्रुवारी २०२४ | १६ जून २०२४ | ऑगस्ट २०२४ | २६ ऑक्टोबर २०२४ | जानेवारी २०२५ |
२ | महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा २०२४ | यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा | जानेवारी २०२४ | २८ एप्रिल २०२४ | जुलै २०२४ | २३ नोव्हेंबर २०२४ | मार्च २०२५ |
वनसेवा | २८ नोव्हेंबर २०२४ | मार्च २०२५ | |||||
विदयुत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा | १० नोव्हेंबर २०२४ |
मार्च २०२५ |
शासनाकडून संबंधित पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्रक प्राप्त झाल्यासच, नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला शक्य होणार आहे. जर, मागणीपत्र वेळेवर नाही मिळाले किंवा ते त्रुटींयुक्त असेल तर मात्र संबंधित वेळापत्रकात बदल होऊ शकतो. कोणत्या संवर्गात नेमक्या किती जागा असतील किंवा संबंधित परीक्षेमधून किती पदे भरावयाची याचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7920
या लिंकवर क्लिक करून तुम्ही २०२३ चे वेळापत्रक व सद्यस्तिथी पाहू शकता.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7954
या लिंकवर क्लिक करून तुम्ही २०२४ चे अंदाजित वेळापत्रक पाहू शकता.
मेकॅनिकलच्या या सर्व परीक्षांसाठी काय अभ्यासक्रम असेल, परीक्षा पॅटर्न काय असेल ते आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये काही सुधारणा असेल तर ती योग्य वेळी केली जाईल.
तर वाट कसली बघताय, लवकर तयारीला लागा.